
''इस्कॉन''ला अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
सासवड, ता. २५ : इस्कॉन संस्थेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राजभवन, मुंबई येथे संस्थेचे मार्गदर्शक सुंदर वर प्रभू यांनी तो स्वीकारला.
पुरंदर व वेल्हे तालुक्यामध्ये भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रचार व प्रसार, आध्यात्मिक ज्ञान शास्त्रशुद्ध पद्धतीने देणाऱ्या इस्कॉन संस्थेने ग्रामीण भागातील केंद्रांमार्फत शेती, पशुपालन व आरोग्य या क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कार्य केले आहे. देशी गोपालन, शेण, गोमूत्र व दूधापासून उपपदार्थ तयार करणे व तसेच सेंद्रिय शेती, गटशेती, मूल्यशिक्षण देण्यात पुढाकार घेतला आहे. गोरेगाव (इस्ट) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थेच्या ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'' पुरस्कार समितीतर्फे हा गौरव करण्यात आला. यावेळी कोश्यारी, समितीचे अध्यक्ष सागर धापटे व पदाधिकारी, इस्कॉन संस्थेचे प्रमुख सेवक हजर होते, अशी माहिती शासनाच्या कृषी विभागाचे मुख्य गुण-नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांनी दिली.
संस्था वेल्हा व पुरंदर तालुक्यामध्ये दूध यापासून विविध उपपदार्थ तयार करणे व त्याचे प्रशिक्षण शेतकरी बांधवांना देण्याबरोबर ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देणे जेणेकरून त्यांचे चारित्र्यामध्ये सुधारणा घडेल यासाठी प्रयत्न चालू आहेत.
02418
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..