Pune-Nashik highway Traffic
Pune-Nashik highway TrafficSakal

पुणे-नाशिक महामार्गावर कोंडी नित्याची

पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीने चाकण परिसरातील व राज्यातील प्रवासी, उद्योजकांना डोकेदुखी ठरत आहे.
Summary

पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीने चाकण परिसरातील व राज्यातील प्रवासी, उद्योजकांना डोकेदुखी ठरत आहे.

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway) वाहतूक कोंडीने (Traffic) चाकण (Chakan) परिसरातील व राज्यातील प्रवासी, उद्योजकांना डोकेदुखी ठरत आहे. दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा (Vehicle Line) लागत असल्याने सारेच वैतागले आहेत.

औद्योगिक वसाहतीतील वाढती वाहनांची संख्या व इतर वाहने यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. एका किलोमीटर अंतर प्रवासासाठी चक्क दोन तास लागत आहेत. ही वाहतूक कोंडी गेल्या पंधरा वर्षांपासून नागरिक, प्रवाशांना सहन करावी लागत आहे. काम सुरू होणार अशी नेत्यांची आश्वासने नागरिक ऐकून मात्र संताप व्यक्त करत आहेत. रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकत असून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही हे भयानक सत्य असल्याने या मार्गाच्या कामासाठी दखल घेणे खूप गरजेचे आहे असे नागरिक, प्रवासी, कामगार, उद्योजक यांचे म्हणणे आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणला बांधलेले दोन भराव मार्ग चुकीच्या ठिकाणी करण्यात आले आहे. कधी बंद, कधी सुरू असलेले वाहतूक नियंत्रक दिवे, वाढत्या अवैध वाहतुकीच्या मार्गावरील अस्ताव्यस्त थांबे, मार्गावरील वाढती अतिक्रमणे, पोलिसांचे वाहतूक नियंत्रणाच्या योग्य नियोजनाचा अभाव, अवजड वाहनांची मोठी वाहतूक, गोदामातून बाहेर पडणारे अवजड कंटेनर, ट्रेलर या वाहनांची विरुध्द बाजूने वाहतूक आदी सारे प्रश्न वाहतूक कोंडी निर्माण करत आहेत. चिंबळी फाटा ते राजगुरुनगर (खेड) पर्यंत पोचण्यास अगदी तीन, चार तास लागत आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवाशांना त्रासदायक ठरतो आहे. वाहतूक कोंडी काही सुटत नाही, दिवसेंदिवस वाढते आहे. येथील औद्योगिक वसाहतींच्या मालाची तसेच इतर औद्योगिक वसाहतीतील मालाची पुणे, नाशिक, मुंबई, नगर, मराठवाडा येथे ये-जा करणाऱ्या वाहतुकीमुळे नागरिकांना उचित स्थळी विलंबाने पोचावे लागत आहे. तर कंपन्यांनाही माल उशिरा मिळत आहे.

Pune-Nashik highway Traffic
पुणे विद्यापीठ ‘इनोव्हेशन’ मध्ये देशात आठवे

पुणे-नाशिक महामार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी व वाहनचालक, कामगार, उद्योजक सारे त्रस्त झाले आहेत. महामार्गावरील अरुंद पूल, रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, वाहनचालकांची बेशिस्ती, वाढलेली अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळत आहे. मार्गावर अतिक्रमण वाढत असल्याने अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

कोंडीची ठिकाणे

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचे पाहिले ठिकाण पुण्याहून निघाल्यानंतर मोशी येथील देहू, आळंदी फाटा, त्यानंतर इंद्रायणी नदीवरील पूल पार केल्यानंतर खेड तालुक्यातील चिंबळी फाटा, मोई फाटा, कुरुळी फाटा, निघोजे एमआयडीसी चौक फाटा, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक येथे नित्याची कोंडी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com