मध्यप्रदेश येथील वाटाण्याची चाकणमध्ये साठ टन आवक

मध्यप्रदेश येथील वाटाण्याची चाकणमध्ये साठ टन आवक

चाकण, ता. १ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात मध्यप्रदेश राज्यातून हिरव्या वाटण्याची सुमारे साठ टनांहून अधिक आवक झाली. त्यास घाऊक बाजारात प्रति किलोला तीस रुपये भाव मिळाला. येथील व्यापाऱ्यांनी हा वाटाणा २६ रुपये किलोने विकत घेतला होता, अशी माहिती व्यापारी रवींद्र बोराटे, कुमार गोरे, आबा गोरे यांनी दिली.
महात्मा फुले बाजारात वाटण्यास मागणी मोठी मागणी आहे. बाजारभाव वाढल्यामुळे परराज्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना फायदा होत आहे. याबाबत व्यापारी बोराटे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी सांगितले की,परराज्यातून हिरव्या वाटाण्याची सध्या मोठी आवक होत आहे. परराज्यातून चाकण येथे वाटाणा आणण्यासाठी सव्वीस रुपये प्रति किलोला भाव पडत आहे. मात्र, चाकण येथील बाजारात वाटाणा तीस रुपये एका किलोला भावाने विकला जात आहे. दरम्यान, किरकोळ बाजारात वाटाणा साठ रुपये किलोने विकला जात आहे. याचा सामान्य ग्राहकाला फटका बसत आहे.
.....
03234

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com