दिव्यांग बांधवांकडून कळसूबाई शिखर सर

दिव्यांग बांधवांकडून कळसूबाई शिखर सर

सासवड शहर, ता. ४ : बारी (ता. अकोला) येथील कळसूबाई हे १६४८ मीटरचे सर्वोच्च शिखरावरील चढाई धडधाकट माणसांनाही घाम फोडणारी असते. मात्र, ५५ दिव्यांग बांधवांनी शिखरावर यशस्वी चढाई करून नववर्षाचे स्वागत केले. यात सात महिलांनी सहभाग नोंदविला. शिवुर्जा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मोहिमेत बीड, पुणे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, नाशिक, मुंबई, ठाणे, जालना आदी जिल्ह्यातून दिव्यांग सहभागी झाले होते.

शिखर सर करण्यास ३१ डिसेंबरला दुपारी दोन वाजता प्रारंभ करण्यात आला. शेतातील पायवाट, बांधलेल्या तर कधी कोरलेल्या पायऱ्या चढत तसेच अवघड लोखंडी शिड्या सर करत दिव्यांग बांधव काठी, कुबड्यांच्या मदतीने रात्री सात वाजता शिखरावर पोचले. येथील विहीरीपाशी कापडी तंबूत मुक्काम केला. एक जानेवारीचा सूर्योदय होण्यापूर्वीच पहाटे लवकर उठून कळसूबाई शिखरावर पोहोचले व शिखरावरून उगवत्या सूर्याचे दर्शन घेतले. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत अभिनंदन करत सकाळी नऊ वाजता शिखर उतरणीस सुरुवात झाली.
दरम्यान, दिव्यांगाची दहावी कळसूबाई मोहीम शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वात यशस्वी व सुरक्षितपणे पार पडली.

मोहीम यशस्वी करण्यासाठी सचिव कचरु चांभारे, जगन्नाथ चौरे, डॉ.अनिल बारकुल, धर्मेंद्र सातव, अंजली प्रधान, सुरेखा ढवळे, जनार्दन पानमंद, शिवाजी शिंदे, यशवंत शिंदे, केशव भांगरे, मच्छिंद्र थोरात, लक्ष्मण वाघे, सागर बोडखे, जीवन टोपे, आबा शिंदे, सतीश आळकुटे यांनी विशेष सहकार्य केले.
डॉ. सूरज बटुले पैठण, अमोल शिंदे, शबाना पखाली, काजल कांबळे, तुकाराम कदम, हर्ष बाबर, ओम तारू, पार्थ चौधरी, सचिन मानकर, सुनील वानखेडे आदींनी यात सहभाग घेतला.

शिखराची माहिती देणाऱ्या फलकाचे अनावरण
कळसूबाई माची मंदिराजवळ कळसूबाई शिखराची माहिती देणारा फलक लावून त्याचे अनावरण करण्यात आले. शिवुर्जा प्रतिष्ठानकडून लावण्यात आलेल्या माहिती फलकाचे प्रायोजकत्व डॉ.अनिल बारकुल यांचे आहे. सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करून पुरणपोळीच्या जेवणाने मोहिमेची सांगता झाली.

04270

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com