ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमीमुळे पुरंदरचे नाव उज्ज्वल

ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमीमुळे पुरंदरचे नाव उज्ज्वल

सासवड शहर, ता. ९ ः पुरंदर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराजांचे जन्म स्थळ, पुरंदर किल्ला, मल्हारगड किल्ला, महात्मा जोतिराव फुले, जेजुरीचा खंडेराया, भुलेश्वरचे मंदिर, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक अशा अनेक ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमीमुळे पुरंदरचे नाव राज्यात उज्ज्वल झाले आहे, असे मत डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कार्यालयामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे, मुंबई सेकंडरी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सुधाकर जगदाळे, राज्य पुरस्कार समितीच्या सदस्यपदी नंदकुमार सागर यांची निवडी झाल्यामुळे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सातत्याने जमिनीवर राहून काम केले. मागील संचालक पदाच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रश्नांना सरांनी न्याय देण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे मतदारांनी मोठ्या मताधिक्यांनी विजयी केले असल्याचे नंदकुमार सागर यांनी सांगितले.
यावेळी अजित नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्यामकांत भिंताडे, बाळासाहेब भिंताडे, भानुदास जगताप, राहुल गायकवाड, दिलीप जगताप, ईश्वर बागमार, कला फरतडे, बापू बडदे, प्रकाश फरतडे, संदेश पवार, अरुण जगताप, आबा क्षिरसागर, माऊली घारे, सदाशिव लांडगे, बंडूकाका जगताप, व्यवस्थापक याकूब सय्यद, मिलिंद जाधव, केशव काकडे, रामदास शेलार, महेश दळवी, वामन कामठे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com