
सासवडच्या शिवतीर्थावर शिवभक्तांचा जनसागर
सासवड शहर, ता. २० : येथील (ता. पुरंदर) येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार संजय जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी शिवरायांना मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांचा जनसागर लोटला होता.
सासवड नगरपालिकेसमोरील शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुड पुतळ्याच्या परिसरांत फुलांची आकर्षक सजावट केली होती. शहरातील तरुण मंडळे, सामाजिक तसेच राजकीय संस्था यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल आणि झांज पथकांचे आकर्षक खेळ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, ज्येष्ठ नेत्या आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्षा सारिका हिवरकर, मुख्याधिकारी निखिल मोरे, यशवंत जगताप, नगरसेवक सुहास लांडगे, अजित जगताप, संजय ग. जगताप, संदीप राऊत, अनिल उरवणे, मराठा महासंघाचे सासवड शहराध्यक्ष संदीप जगताप, बाबूराव गायकवाड, मंगल म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडूकाका जगताप, राहुल गिरमे, कला फडतरे, दत्तानाना जगताप त्याच प्रमाणे तालुक्यातील जयंती उत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
04560
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..