ट्रॉली अंगावर गेल्याने
आंबेगावात तरुण ठार

ट्रॉली अंगावर गेल्याने आंबेगावात तरुण ठार

मंचर, ता. ५ : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावरून गेल्याने ऊसतोड कामगार प्रेमचंद ताराचंद भोसले (वय १८) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंचर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक रोहन यशवंत शिंदे (रा. रोहितळ, ता. गेवराई, जि. बीड) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ताराचंद भोसले हे दत्त मंदिराजवळ कुटुंबासमवेत ऊसतोडणीचे काम करत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रेमचंद हा झोपडीजवळ झोपलेला होता. त्यावेळी चालक रोहन शिंदे हा ट्रॅक्टर (एमएच ३१ ए ९६३२) ट्रॅक्टर पाठीमागे घेत होता. त्यावेळी ट्रॅक्टरची ट्रॉली प्रेमचंद याच्या अंगावर गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ताराचंद भोसले यांनी याबाबत मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com