सुनेच्या मारहाणीत सासू जखमी

सुनेच्या मारहाणीत सासू जखमी

मंचर, ता. ७ : सुनेने डोक्यात कलथा मारुन सासूला जखमी केल्याची घटना मणिपूर-शेवाळवाडी (ता.आंबेगाव) येथे घडली. मंचर पोलिसांनी याप्रकरणी रेश्मा नीलेश थोरात हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भामाबाई बाळू थोरात (वय ५५), असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पती नीलेश व रेश्मा यांच्यात भांडणे सुरु होते. तेव्हा तुम्ही भांडण करू नका, असे भामाबाई समजावून सांगत होत्या. त्यावेळी चिडलेल्या रेश्माने भामाबाई यांना शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात कलथा मारला. त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भामाबाई यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस नाईक नंदकुमार घोडे तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com