मंचरमधील दोघांवर 
गुटखाप्रकरणी कारवाई

मंचरमधील दोघांवर गुटखाप्रकरणी कारवाई

Published on

मंचर, ता. १२ : मंचर (ता. आंबेगाव) शहरात गुटखा पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी दोन जणांविरोधात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण पाच हजार ४०९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुजल पान स्टॉलमध्ये ओंकार राजेंद्र मिंढे (रा. निघोटवाडी, ता. आंबेगाव) याच्याकडे एक हजार ५७३ रुपये किमतीचा व शकील अब्दुल सत्तार इनामदार (रा. मंचर) याच्याकडे तीन हजार ८३६ रुपये किमतीचा गुटखा पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांना मिळाला. याबाबत महिला पोलिस मेघा शिंदे यांनी मिंढे व इनामदार यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरिक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक लहू थाटे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com