अरण येथे शनिवारी माळी समाज मेळावा
इंदापूर, ता. २४ ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथे ३० एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता राज्यस्तरीय माळी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी सांगितले की, मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, इंदापूर तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.