मंचरमध्ये शिवभक्तांना शुक्रवारी नाष्ट्याची सोय

मंचरमध्ये शिवभक्तांना शुक्रवारी नाष्ट्याची सोय

मंचर, ता.१६ : “शिवजन्म उत्सवानिमित्त शनिवारी (ता.१९) शिवनेरी किल्ले (ता.जुन्नर) येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी शिवभक्त जाणार आहेत. त्यांच्यासाठी नाष्टा,चहा, दूध, केळी, बिस्किटे, पोहे वाटप मंचर (ता.आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.१८) रात्री आठ वाजता करण्यात येणार आहे,” अशी माहिती शिवश्री शरद पोखरकर व सतीश बेंडे पाटील यांनी दिली.
“अनेक शिवभक्त हे शिवजन्म सोहळ्यासाठी मुक्कामी शिवनेरी किल्ल्याकडे जातात. त्यांच्या सोयीसाठी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. शिवभक्तांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यावा,”असे आवाहन सचिन तोडकर व प्रशांत बगल यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com