Loot
LootSakal

पोलिस उपनिरीक्षकाने उकळली अडीच लाखांची खंडणी

एका पोलिस उपनिरीक्षकाने होमगार्डाची मदत घेत मलठण फाट्यावर एका टॅंकरचालकाला तब्बल अडीच लाखांची खंडणी वसूल करून लुटल्याची घटना घडली.
Summary

एका पोलिस उपनिरीक्षकाने होमगार्डाची मदत घेत मलठण फाट्यावर एका टॅंकरचालकाला तब्बल अडीच लाखांची खंडणी वसूल करून लुटल्याची घटना घडली.

लोणी काळभोर - एका पोलिस उपनिरीक्षकाने (Police Sub Inspector) होमगार्डाची मदत घेत मलठण फाट्यावर एका टॅंकरचालकाला (Tanker Driver) तब्बल अडीच लाखांची खंडणी (Ransom) वसूल करून लुटल्याची (Loot) घटना घडली आहे. खंडणीच्या या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून त्यांनी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणी खेडचे विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

महेंद्र गरूड, (रा. चव्हाणवाडी, करडे, ता. शिरूर) हे क्लिनर ज्ञानेश्वर माळी यांच्यासमवेत डिझेलचा टॅँकर घेऊन कोरेगाव भीमा येथील सेको कंपनीत जात होते. लोणी काळभोर येथून नगर-पुणे रस्त्याने डिग्रजवाडी फाट्याच्या पुढे त्यांच्या पाठीमागून लाल रंगाची ब्रेझा कार आली व ती टॅकरला आडवी लावून टॅंकर थांबविण्यास भाग पाडले. त्यातून एक निळ्या रंगाची पॅँट, पांढरा शर्ट आणि फिकट निळसर रंगाचे जॅकेट असलेला एक व्यक्ती खाली उतरला. त्याने चालक गरूड यांना आपण पोलिस असल्याचे सांगत टॅंकरचालकाला कारमधील मोठ्या साहेबांकडे येण्यास सांगितले. तसेच टॅंकर पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितले. टॅंकरचालकाने त्याला विचारले मात्र, त्याने नाव सांगण्यास नकार दिला.

Loot
शेतकर्‍याची मुलगी बनली सनदी लेखापाल, आरती फराटे हिचे सी.ए. परीक्षेत यश

तडजोडीत अडीच लाख उकळले

त्यानंतर हा टॅँकर सणसवाडी हददद्दीतील कल्पेश वे ब्रिजवर आणून त्याचे वजन केले आणि मोकळ्या मैदानात उभा करण्यास सांगितले. टॅंकरचालकाला कारमध्ये बसवून टॅँकरमालक व त्यांचे मेहुणे दिगंबर जालिंदर शितोळे यांना व्हॉटस्अप कॉल करून पाच लाख रूपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली. तसेच टॅँकर पोलिस स्टेशनला घ्यायला सांगून दोन ते तीन ठिकाणी सुमारे 30 ते 40 किलोमीटर फिरवून शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील हायवे किंग पेट्रोल पंपावर लावण्यास सांगितला. त्यानंतर तोतया पोलिस अधिका-याच्या कारमध्ये टॅंकरचालकाला बसविले व मलठण फाट्यावरील संजिवनी हॉस्पिटलजवळ आणले. तेथे टॅँकरमालक शितोळे यांच्याकडून अडीच लाख रूपये उकळले. याबाबत कुणाला सांगितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि टॅँकर कसा चालतो, अशी धमकी दिली.

पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

या तोतया पोलिसाचा फोन क्रमांक 7028374273 असा असून या प्रकरणी सुरवातीला भीतीच्या सावटाखाली असलेल्या चालक गरूड यांनी नंतर पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे सोमवारी (ता. 14) अपहरण आणि खंडणीची तक्रार देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

तातडीने तपास करणार

याबाबत देशमुख म्हणाले, 'हे प्रकरण गंभीर असल्याने खेड विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक तपासात या प्रकरणात एक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी व होमगार्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com