राष्ट्रीय एकात्मता उद्यान देशभक्तीची प्रेरणा देईल-PNE21R0339 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय एकात्मता उद्यान देशभक्तीची प्रेरणा देईल-PNE21R0339
राष्ट्रीय एकात्मता उद्यान देशभक्तीची प्रेरणा देईल-PNE21R0339

राष्ट्रीय एकात्मता उद्यान देशभक्तीची प्रेरणा देईल-PNE21R0339

sakal_logo
By

भोर, ता. २२ : ''''परमवीरचक्रधारकांचे राष्ट्रीय एकात्मता उद्यान हे सर्वांना देशभक्तीची प्रेरणा देत राहील,'''' असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. कुरुंजी-मळे (ता.भोर) येथे देशातील २१ परमवीरचक्र धारकांचे स्मारक उभारलेल्या ''राष्ट्रीय एकात्मता उद्याना''चे उद्‌घाटन बुधवारी (ता.२२) नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करीत असलेल्या असीम फाउंडेशनने ''गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज''च्या मदतीने दीड एकरांमध्ये उद्यानाची निर्मिती केली आहे. लष्करप्रमुख नरवणे यांनी परवीरचक्रधारकांनी बलीदान दिलेल्या युध्दभूमीच्या ठिकाणांची माती असलेल्या कलशाची पूजा केल्यानंतर उद्यानाचे उद्‌घाटन केले. यावेळी भारताच्या सीमेजवळ स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या महिलांचा लष्करप्रमुखांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

भारताच्या उत्तरेकडील सीमेजवळील भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या प्रतिकृती आणि एका अॅपिथिएटरची निर्मिती करणार असल्याचे सारंग गोसावी यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले. हे उद्यान पाहण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी सोय करणार आहे. सध्या हयात असलेले परवीरचक्रधारक योगेंद्रसिंग यादव, संजयकुमार आणि बानासिंग हे उद्यानास भेट देण्यास येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी असीम फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सारंग गोसावी, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सई बर्वे, संस्कृती बापट, निरुता किलेदार, संदीप तांबे, तेजस्विनी कुलकर्णी, निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, सचिन गाडगीळ, गंगोत्री होम्सचे राजेंद्र आवटे, गणेश जाधव व मकरंद केळकर, रचनाकार समीर दुराफे, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट, भोर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस निरीक्षक सचिन पाटील, विठ्ठल दबडे आदींसह लष्करातील अधिकारी व देशप्रेमी उपस्थित होते.
संस्कृती बापट यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


मी ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी...
सारंग गोसावी यांनी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची ओळख करून देताना ज्ञानप्रबोधिनीचा उल्लेख केला नाही. यावर नरवणे यांनी भाषणाच्या सुरुवातीस मी ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी असल्याचे मराठीतून सांगितले. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीचे नाव ऐकल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

उद्यानाची खास वैशिष्ट्ये
- प्रत्येक परमवीरचक्रधारकांची माहिती मराठीतून ऐकावयास मिळणार
- परमवीरचक्रधारकांच्या रणभूमीचे प्रतिकृती पाहावयास मिळणार
- सीमेवरील संस्कृतीच्या प्रतिकृती
- अँपिथिएटर
- परमवीचक्रधारकांच्या रणभूमीच्या मातीचे दर्शन


कुरुंजी (ता.भोर) - राष्ट्रीय एकात्मता उद्यानाच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित असलेले भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे (मध्यभागी) व मान्यवर.
29910