Police arrested 12 accused with cannabis
Police arrested 12 accused with cannabissakal

यवत पोलिसांकडून १६७ किलो गांजा जप्त

पुणे-सोलापूर महामार्गाने आंतरराज्य व राज्यांतर्गत गांजाची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात दौंड तालुक्यातील यवत पोलिसांना यश आले आहे.

पाटस : पुणे-सोलापूर महामार्गाने आंतरराज्य व राज्यांतर्गत गांजाची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात दौंड तालुक्यातील यवत पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पाटस हद्दीत मध्यरात्री दीड वाजता १६७ किलो गांजा व गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक असा एकूण ७८ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी पुरुष व महिलांसह १२ जणांना अटक केली. पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी याबाबत माहिती दिली. (Police seized a total of 78 lakh 10 thousand items including 167 kg of cannabis and two trucks)

Police arrested 12 accused with cannabis
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ साठी लोणावळा सज्ज

महामार्गावरून रविवारी मध्यरात्री आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातून मालट्रकमधून पुणे येथे गांजाविक्रीसाठी जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दोन पथके तयार केली. पाटस हद्दीत यासाठी सापळा लावला. रात्री दीडच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयित ट्रक अडविण्यात आले. या वेळी पोलिस पथकाने ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गांजाच्या पिशव्या आढळून आल्या. पोलिसांनी मोठ्या शिताफीने गांजा व बारा आरोपींना ताब्यात घेतले.(Police arrested 12 accused with cannabis)

Police arrested 12 accused with cannabis
नागपूर : ढकलल्याने मोठ्या बहिणीचा मृत्यू; लहान बहिणीवर गुन्हा

अंदाजे ३० लाख रुपये किमतीचा गांजा तर ४८ लाख रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले दोन मालवाहतूक ट्रक असा एकूण ७८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रविकुमार पुपल्ला (आंध्र प्रदेश), रवी अजमेरा (आंध्र प्रदेश), उमेश थोरात (मंचर, पुणे), युवराज पवार (मुथळा, बुलडाणा), उत्तम चव्हाण (करवंड, बुलढाणा), प्रकाश व्यंकटेश्वराव (विजयवाडा, आंध्र प्रदेश), किसन पवार (मुथळा, बुलडाणा), रुक्मिणी पवार (ढाकरखेड, बुलडाणा), मीना पवार (ढाकरखेड, बुलडाणा), ममता चव्हाण (करवंड, बुलडाणा), लीला चव्हाण (चिखली, बुलडाणा), ललिता पवार (ढाकरखेड, बुलडाणा) या बारा आरोपींना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com