बोरीतील आत्महत्या प्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

बोरीतील आत्महत्या प्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

वालचंदनगर, ता. १४ : बोरी (ता. इंदापूर) येथील इयत्ता नववीमधील अल्पवयीन विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना इंदापूर न्यायालयाने मंगळवार (ता. १८) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
बोरीमध्ये बुधवार (ता. १२) रोजी सिद्धी गजानन भिटे (वय १५) या विद्यार्थिनीने छेडछाड व टिंगल टवाळीला कंटाळून घरामध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी बोरीतील तिघाजणांवर गुन्हा दाखल केला होता. यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. पोलिसांनी गणेश ऊर्फ जी. के. संतोष कुचेकर (वय २४), यश अरुण गरगडे (वय १८, रा. दोघे बोरी) यांना तातडीने अटक करून इंदापूर न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने मंगळवार (ता. १८) पर्यंत पोलिस कोठडी दिली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com