
इंदापूरमध्ये उद्या पवार यांचा दौरा
वालचंदनगर, ता. १ : ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्यासह राष्ट्रवादी दिग्गज नेते रविवारी (ता. ३) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्त लाखेवाडी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यात भाजपमधील अनेक दिग्गज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये सातत्याने चढाओढ पाहायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यापासून इंदापूरच्या राजकारणामध्ये अनेक बदल होत चालले आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, इंदापूर पंचायत समितीच्या माजी सभापती स्वाती बापूराव शेंडे यांच्यासह अनेक दिग्गजांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..