राज्यस्तरीय चारोळी स्पर्धेत विजय सातपुते प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय चारोळी स्पर्धेत विजय सातपुते प्रथम
राज्यस्तरीय चारोळी स्पर्धेत विजय सातपुते प्रथम

राज्यस्तरीय चारोळी स्पर्धेत विजय सातपुते प्रथम

sakal_logo
By

भोर, ता. १ : येथील साहित्य सहवास मंडळातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चारोळी स्पर्धेत पुण्यातील विजय सातपुते यांनी प्रथम क्रमांक मिळवला; तर जयश्री कुलकर्णी व अंबरनाथ येथील नितीन खंडागळे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. तसेच, चंद्रपूर येथील जगदीश्वर मुनघाटे, नाशिक येथील महेंद्र जोशी, भोरमधील राजश्री पवार व पुण्यातील हेमा जाधव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
साहित्य सहवास मंडळाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते. येथील सोनाली गार्डनमध्ये या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. विडंबनकार व विनोदी साहित्यीक बंडा जोशी, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जोत्स्ना चांदगुडे, नाट्य व दूरदर्शन कलाकार सुजाता भगत, लघुपटनिर्माते सुजित कदम यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विजेत्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कमेसह शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात आले. याशिवाय मंडळातर्फे कोरोना काळात जनसेवा केलेले ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांना ‘आदर्श जनसेवक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी साहित्य सहवास मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेटे, उपाध्यक्ष संजय इंगुळकर, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, शालन खुटवड, सारंग शेटे व विठ्ठल टिळेकर आदी उपस्थित होते. यावेळी बंडा जोशी म्हणाले, ‘‘कविता करणे सोपे असते, परंतु लोकांच्या मनात कवी म्हणून स्मरणात रहाणे अवघड असते.’’ तसेच, साहित्य चळवळीत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची विनंती त्यांनी साहित्य सहवास मंडळाला केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top