कमान सोसायटीत जनसेवा पॅनेलचा विजय

कमान सोसायटीत जनसेवा पॅनेलचा विजय

चास, ता. ३ : कमान (ता. खेड) येथील कमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भैरवनाथ महाराज जनसेवा विकास पॅनेलने १३ पैकी ११ जागा जिंकत भैरवनाथ महाराज शेतकरी पॅनेलचा पराभव केला.
कमान सोसायटीची निवडणूक स्थापनेपासून बिनविरोध होत असे. मात्र, यावेळी निवडणूक रंगतदार व चुरशीची झाली. २७८ सभासद असलेल्या निवडणुकीत २५६ जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. निवडणुकीत भैरवनाथ महाराज जनसेवा विकास पॅनेलने १२ पैकी ११ जागा जिंकून भैरवनाथ महाराज शेतकरी पॅनेलचा पराभव केला.
विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गट- शांताराम नाईकरे (१३१), मारुती नाईकरे (१३०), बाळासाहेब थिटे (१२६), बाजीराव नाईकरे (१२५), अविनाश नाईकरे (११९), चंद्रकांत नाईकरे (११९), विठ्ठल नाईकरे (११९), सुरेश नाईकरे (११९). इतर मागासवर्गीय गट- माजी सरपंच अशोक नाईकरे (१३५). महिला प्रतिनिधी गट- आशाबाई नाईकरे (१४२), रखमाबाई रोकडे (१३८). अनुसूचित जमाती प्रतिनिधी गट- नामदेव जाधव (१३५). भैरवनाथ महाराज शेतकरी पॅनेलचे अविनाश नाईकरे हे एकमेव उमेदवार विजयी झाले; तर याच पॅनेलचे विठ्ठल गोसावी हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे त्यांना दोन जागांवर त्यांना समाधान मानावे लागले.
उद्योजक संदीप मुळूक, सरपंच योगेश नाईकरे, माजी सरपंच अशोक नाईकरे यांच्यासह समस्त ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ महाराज जनसेवा पॅनेलने सोसायटीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. जी. लादे यांनी काम पाहिले. विजयानंतर भैरवनाथ महाराज जनसेवा विकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके वाजवून, गुलाल भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष केला.

३२५९८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com