वाल्हे येथे १६२ मुलांचे लसीकरण

वाल्हे येथे १६२ मुलांचे लसीकरण

वाल्हे, ता. ३ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने सोमवारी १५ ते १८ वयोगटांतील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार व वाल्हेचे सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या दिवसी १६२ मुलांचे लसीकरण करण्यात आले.

आडाचीवाडी सरपंच दत्तात्रय पवार, सत्यवान सूर्यवंशी, मोहन वाघमारे, पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार, हनुमंत पवार, राजेंद्र डोंगरे, दादासाहेब म्हेत्रे, अनिल भुजबळ, अरविंद पवार आदी या वेळी उपस्थित होते.
लाभार्थी मुला-मुलींनी लस घेण्यास पुढे यावे, प्रत्येक विद्यार्थ्यांने ऑनलाइन लसीची नोंदणी करावी. यामध्ये काही समस्या आल्यास संबंधितांनी आधार कार्ड घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन पर्यवेक्षक राजेंद्र दळवी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील श्रद्धा बोळेगावे, रामदास वाघोले, किशोर काळोखे, सुवर्णा गार्डी, राणी नाळे, वैशाली दानवले, सुजाता पवार, नम्रता लव्हाळे, प्राची फाळके, अमित झेंडे आदींनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.

Val०३p१- लाVal०३p२-
2S32729

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com