उसाच्या गाडीला संकटातून काढले बाहेर आमदार ॲड. अशोक पवार यांचे औदार्य; न्हावरे-निमोणे रस्त्यावरील प्रसंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसाच्या गाडीला संकटातून काढले बाहेर
आमदार ॲड. अशोक पवार यांचे औदार्य; न्हावरे-निमोणे रस्त्यावरील प्रसंग
उसाच्या गाडीला संकटातून काढले बाहेर आमदार ॲड. अशोक पवार यांचे औदार्य; न्हावरे-निमोणे रस्त्यावरील प्रसंग

उसाच्या गाडीला संकटातून काढले बाहेर आमदार ॲड. अशोक पवार यांचे औदार्य; न्हावरे-निमोणे रस्त्यावरील प्रसंग

sakal_logo
By

शिरूर, ता. ७ : उसाने भरलेली बैलगाडी रस्त्याकडे खड्ड्यात कलल्याने ऊसतोड मजुराची चाललेली घालमेल... बैलांची होत असलेली ओढाताण आणि प्रसंगी गाडीवानाकडून त्यांना होत असलेली मारहाण... तेवढ्यात एक मोटार तेथे येऊन थांबते अन्‌ गाडीतून उतरलेला कडक कपड्यातील नेते प्रथम बैलांना मारणाऱ्या गाडीवानाला सुनावतो. त्यानंतर वस्तुस्थिती कळल्यावर क्षणाचाही विलंब न करता थेट खड्ड्यात जाणाऱ्या त्या गाडीला संतुलीत करण्यासाठी हा नेता सदऱ्याच्या बाह्या सावरतो..!

कडक शिस्तीचे अन्‌ तेवढाच संवेदनशील असलेले आमदार ॲड. अशोक पवार यांच्या रूपाने न्हावरे-निमोणे रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना गुरुवारी (ता. ६) वरील चित्र दिसून आले. राष्ट्रवादी सोशल मीडीयाचे उल्लेखनीय काम करणाऱ्या अजय हिंगे या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी ॲड. पवार हे पत्नी सुजाता पवार, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे यांच्यासह मोटारीतून जात होते. त्यावेळी न्हावरेजवळ (ता. शिरूर) निमोणे रस्त्यावर उसाने भरलेली एक बैलगाडी मागील बाजूला कललेली व गाडीवान बैलांना मारत असल्याचे पाहून ते थांबले. बैलांना होणारी मारहाण पाहून संतप्त झालेले ॲड. पवार त्या गाडीवानावर सुरुवातीला चिडले. पण गाडीवान व त्याच्या पत्नीने गाडी मागे उरळल्याने कधीही उलटू शकते, असे सांगितल्यावर त्यांच्या रागाचा पारा उतरला. त्यानंतर त्यांनी लगेच सदऱ्याच्या बाह्या सरसावून ती गाडी संतुलित करण्यात मदत केली.

याबाबत ॲड. पवार यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘गाडीवान बैलाला मारत असल्याचे पाहून सुरुवातीला त्याचा राग आला म्हणून आम्ही थांबलो; पण नंतर त्याची अडचण माझ्या लक्षात आली. गाडी खड्ड्यात गेल्याने कधीही उलटून दुर्घटना घडली असती. कारण उसाच्या गाडीवर त्या गाडीवानाची पत्नी होती. माणुसकीच्या नात्याने त्याला मदत केली.’’

E22S33663

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top