गणेश भगत अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश भगत अध्यक्षपदी
गणेश भगत अध्यक्षपदी

गणेश भगत अध्यक्षपदी

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : येथील बारामती तालुका शिक्षक को ऑपरेटीव्ह केडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी गणेश भगत व उपाध्यक्षपदी शिवदत्त भोईटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या व्यतिरिक्त वसतिगृहाच्या अध्यक्षपदी देविदास ढोले यांची तर सचिवपदी संतोषकुमार राऊत यांची फेरनिवड करण्यात आली. संस्थेच्या मासिक सभेमध्ये अलका रसाळ यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या जागी नवीन नियुक्ती करण्यात आली. आगामी काळात जाहीरनाम्यात दिलेल्या वचनानुसार संस्थेचे उत्पन्न वाढवून सभासदांना जास्तीतजास्त चांगली सेवा देणार असल्याचे भगत यांनी नमूद केले. यावेळी बाळासाहेब मारणे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी अशोक भापकर, रमेश भोसले, प्रकाश गोलांडे, दत्तात्रेय हारे, त्रिंबक ताम्हाणे यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार करण्यात आला. अलका रसाळ यांनी कामकाजाचा आढावा घेतला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top