बारामतीत मोफत शिबिराचा कालावधी वाढविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत मोफत शिबिराचा कालावधी वाढविला
बारामतीत मोफत शिबिराचा कालावधी वाढविला

बारामतीत मोफत शिबिराचा कालावधी वाढविला

sakal_logo
By

बारामती, ता. १४ : ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून व गिरिराज हॉस्पिटलचे डॉ. रमेश भोईटे यांच्यावतीने महात्मा फुले योजना तसेच अनंत आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी, ऍन्जिओग्राफी व बायपास सर्जरी शिबिराचा कालावधी एक महिन्याने वाढविण्यात आला आहे. १२ जानेवारी रोजी संपणारे शिबिर आता १२ फेब्रुवारी पर्यंत चालेल.
या शिबिरांमध्ये गेल्या महिनाभरापासून नागरिकांनी मोफत शस्त्रक्रिया करून घेतल्या. सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक रुग्ण शिबिराचा लाभ घेऊ शकले नाहीत. अशा नागरिकांनी या शिबिराचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्या नुसार कालावधी एक महिन्याने वाढविण्यात आला आहे. मागील ४ वर्षात शिबिरांतर्गत २ हजार ९५६ नागरिकांच्या ऍन्जिओग्राफी करण्यात आल्या आहेत. तसेच १००९ अँजिओप्लास्टी, ३८२ बायपास तर ८० हार्ट सर्जरी करण्यात आल्या आहेत. या शिबिराचा कालावधी वाढविल्याने आणखी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार रोहित पवार व डॉ. रमेश भोईटे यांनी केले आहे.
या शिबिराचे आयोजन गिरिराज हॉस्पिटल एसटी स्टँडनजीक इंदापूर रोड, बारामती येथे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६९६३३०३३० या‌ क्रमांकावर संपर्क साधावा. शिबिराचा लाभ घेण्यासाठी पूर्व तपासणीचा रिपोर्ट व औषधे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तसेच आधार कार्ड व मतदान कार्ड सोबत आणावे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top