न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश
Sakal

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश

देशातील मुलांना निओटेरिक इनोव्हेटर्स म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून अटल इनोव्हेशन मिशन सुरु करण्यात आले आहे.

बारामती, ता. २५ : येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेचे न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील आठवीतील चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले गुण मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. अकुल संपतराव जाधव याने ८६.५७ टक्के गुण संपादन करून राज्य गुणवत्ता यादीत १९ वा क्रमांक; तर, पुणे जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या जॉयसी जोसेफ यांनी दिली.
विद्यालयातील इयत्ता आठवीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांचे कंसात टक्के पुढीलप्रमाणे : अकुल संपतराव जाधव (८६.५७), शिवम सुनील पाटील (६२.४१), ओम शंकर कचरे (५७.७१), जयराज संतोष सपकाळ (५५.७०). या विद्यार्थ्यांना संतोष कदम, रूपाली लाळगे, स्वाती कडू व शिवाई कदम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सर्व विश्वस्त, रजिस्टार व विद्यालयाच्या प्राचार्या यांनी अभिनंदन केले.

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश
सार्वजनिक सुट्ट्या मूलभूत अधिकार नाही, सुट्ट्या कमी करण्याची वेळ - HC

मुलांच्या व तरुणांच्या मनात कुतूहल, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याशिवाय डिझाइन मानसिकता, संगणकीय विचार, अनुकूल शिक्षण, भौतिक संगणक आदी कौशल्ये विकसित करण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे.
यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अर्थ विभागाचे सहसचिव सीताराम गवळी, भोर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, मुख्याध्यापक बाळासाहेब वाघ, कनिष्ठ महाविद्यालय विभागाचे प्रमुख प्रा. संभाजी सरवदे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी अटल टिंकरींग लॅबमधील वैज्ञानिक उपकरणांची व साधनांची माहिती दिली.
विद्यालयातील या अटल टिंकरींग लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक वृत्ती जागृत होऊन भविष्यात त्यांना संशोधन क्षेत्रात संधी मिळेल असा विश्वास अभयकुमार साळुंके यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि भोर तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांचे चिंतन शिबिर घेण्यात आले. सलीम शिकलगार व ज्योती दीक्षित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर सुनील थोपटे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com