शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा. कृषी विभागाचा स्त्युत्य उपक्रम.

शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा. कृषी विभागाचा स्त्युत्य उपक्रम.

Published on

सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही : घोले
गुनाट, ता. ७ : ‘‘हवामानातील बदलामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ व उत्पादनात घट, असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. भविष्यात शेती, शेतकरी आणि पिके टिकवायची असतील, तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही,’’ असे मत कांदा संशोधक व कृषिनिष्ठ राष्ट्रपती पदक विजेते संदीप घोले यांनी केले.

गुनाट (ता. शिरूर) येथे कृषी सहायक जयवंत भगत यांच्या पुढाकारातून कृषी विभागाने परिसरातील शेतकऱ्यांसाठी कांदा व ऊस या पिकांसंदर्भात शेतीदिनानिमित्त शेतकऱ्यांची मार्गदर्शनपर शेतीशाळा आयोजित केली होती. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश कोळपे, खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनावणे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, कृषी पर्यवेक्षक कांतिलाल वीर आदींसह शिंदोडी, निमोणे, चिंचणी, सादलगाव, वडगाव रासाई आदी भागातील शेतकरी उपस्थित होते.

कांदा बीजप्रक्रिया, खतांच्या मात्रा व व्यवस्थापन, पिकांना पाणी देण्याचा, फवारणी करण्याचा कालावधी, पीक फेरपालट, सेंद्रिय शेतीचे महत्त्व आदी बाबींवर मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. घोले म्हणाले,‘‘केवळ अज्ञानामुळे शेतकरी नाहक खतांवर खर्च करत आहे. पिकांविषयी परिपूर्ण माहिती घेतल्यास खर्चात एकरी दहा ते वीस हजारांची बचत होते व उत्पादनातही वाढ होते.’’

22S33797

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com