संविधानानुसारच लोकशाही मजबूत होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधानानुसारच लोकशाही मजबूत होईल
संविधानानुसारच लोकशाही मजबूत होईल

संविधानानुसारच लोकशाही मजबूत होईल

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ‘‘चांगल्याला चांगले म्हणण्याची प्रवृत्ती कमी होत असून, मानसिक खच्चीकरण करण्यासाठी एक वर्ग काम करत आहे. ‘बॉस’ हा सर्वज्ञ नाही, अशिक्षित माणसाकडेही शहाणपण आहे. सध्या अनेक विचित्र घटना घडत असल्या तरी संविधानानुसारच देशात परिवर्तन होऊन लोकशाही मजबूत होईल’’, असा विश्वास निवृत्त सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई), महाराष्ट्र राज्य व ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन पुणेतर्फे पत्रकार भवन येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होत, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकार कुणाचेही असो, शोषित-वंचितांकडे मात्र प्रत्येक सरकारचे दुर्लक्षच झाले आहे, अशी खंत व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल विलास राजपूत, पंचवीस पदव्या प्राप्त केल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले डॉ. बबन जोगदंड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स सर्व्हेअर या संस्थेच्या सीईओ व राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राहुल जाधव, जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागातील मुख्य अभियंतापदी पदोन्नती मिळाल्याबद्दल मिलिंद जीवने यांचा सत्कार खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड व सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त सचिव जी. एम. कंधारे उपस्थित होते. बानाईचे अध्यक्ष पांडुरंग शेलार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. तर ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बनसोडे यांनी आभार मानले.

PNE22S34511

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top