आकडेबहाद्दरांना ‘झटका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकडेबहाद्दरांना ‘झटका’
आकडेबहाद्दरांना ‘झटका’

आकडेबहाद्दरांना ‘झटका’

sakal_logo
By

बारामती, ता. २१ : आकडेबहाद्दर बिनदिक्कतपणे विजेची चोरी करतात. मात्र, त्यांच्या वाढीव भारामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यांना अद्दल घडविण्यासाठी महावितरणच्या बारामती परिमंडलाने धडक मोहीम हाती घेतली असून, एका दिवसात हजारो आकडे काढून त्यांच्या केबल व मोटारी जप्त करण्याचे काम केले आहे. या प्रयत्नामुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे. ही धडक मोहीम अशीच सुरु राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आकडेबहाद्दरांवर कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० ॲम्पीअरच्या पुढे आहे, अशा बारामती परिमंडलात असलेल्या ३९८ वाहिन्यांना टार्गेट करून गुरुवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली. यामध्ये अनधिकृतपणे जोडलेले कृषी पंप, त्याचे केबल, स्टार्टर आदी जप्त केले जात आहे. घरगुती व इतर ग्राहकांचे आकडेसुद्धा काढले जात आहेत. मोहीमेपूर्वी व मोहिमेनंतर किती भार कमी झाला, याचा लेखाजोखा कर्मचाऱ्यांना विचारला जाणार आहे. या कामात वरिष्ठ अभियंत्यापासून जनमित्र, ऑपरेटर, कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बारामती परिमंडळात एकूण १३ विभाग आहेत. या प्रत्येक विभागातून किमान दोन हजार ग्राहकांवर जरी कारवाई अपेक्षित धरली, तरी किमान २६ हजार अनधिकृत पंप हटवले जातील. त्यातून प्रतिपंप पाच अश्वश्क्तीचा जरी गृहीत धरला, तरी किमान १५० मेगावॅटपेक्षा जास्तीचा ताण कमी होणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top