भोरच्या उपनगराध्यक्षपदी
चंद्रकांत मळेकर बिनविरोध

भोरच्या उपनगराध्यक्षपदी चंद्रकांत मळेकर बिनविरोध

भोर, ता. १० : येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे चंद्रकांत मळेकर यांची बिनविरोध निवड झाली. सोमवारी (ता. १०) दुपारी नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ मळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. माजी उपनगराध्यक्ष अमित सागळे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, गटनेते सचिन हर्णसकर, गणेश पवार, सुमंत शेटे, देविदास गायकवाड, समीर सागळे, नगरसेविका पद्मिनी तारू, आशा रोमन, तृप्ती किरवे, रूपाली कांबळे, अमृता बहिरट, वृषाली घोरपडे, सोनम मोहिते, अनिल पवार, स्नेहा पवार, आशा शिंदे उपस्थित होत्या. उपनगराध्यक्ष निवडीनंतर आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील स्वच्छता, पाण्याच्या वितरणाचे प्रश्न आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मळेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com