भोर येथील शिबिरात ८५ बाटल्या रक्तसंकलन

भोर येथील शिबिरात ८५ बाटल्या रक्तसंकलन

भोर, ता. १२ ः राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८५ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. नगरपालिकेच्या वतीने येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकमध्ये झालेल्या या आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगराध्यक्षा निर्मला आवारे, कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षा गीतांजली शेटे, नंदा जाधव, उपनगराध्यक्ष अमित सागळे, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक गणेश पवार, चंद्रकांत मळेकर, देविदास गायकवाड, सुमंत शेटे, समीर सागळे, नगरसेविका पद्मिनी तारू, आशा रोमन, तृप्ती किरवे, रूपाली कांबळे, अमृता बहिरट, वृषाली घोरपडे, सोनम मोहिते, अनिल पवार, स्नेहा पवार, आशा शिंदे आदी उपस्थित होते. हडपसर येथील अक्षय ब्लड बँकेचे डॉ. देवाशिष गाढे यांनी अभिजित अरणकल्ले, सागर लोहोकरे, प्रशांत शिगाव, पौर्णिमा बनसोडे, नम्रता रांजणे, शिवराज ढमाले व प्रफुल्ल गवळी आदींसमवेत रक्तसंकलन केले. प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट भेट देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com