महिलांनी कर्तृत्व सिद्ध करावे

महिलांनी कर्तृत्व सिद्ध करावे

वाल्हे, ता. २८ : महिलांकडे स्त्रीत्व, मातृत्व, कर्तृत्व आहे. वृक्षाप्रमाणे फुलण्याची क्षमता आहे. ती क्षमता व असणारं सामर्थ्य फक्त सिद्ध करायला हवं. महिलांनी वृक्षाप्रमाणे फुलाव आणि कर्तृत्व सिद्ध करावे. निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज असून राजेंद्र बरकडे व सविता बरकडे यांनी प्रत्येक सत्कारार्थीला केलेल्या रोप वाटपामुळे समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळणार आहे, असे मत अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले.
पिसुर्टी (ता. पुरंदर) येथे शिवशक्ती धर्मदाय सामाजिक विकास सेवा संस्था, शिवशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. वाड बोलत होत्या.
पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, दत्ताआबा चव्हाण आदींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी सिनेअभिनेते महेश देवकाते, राजेश काकडे, प्रियांका मोरे, अनंता तांबे, माणिकराव चोरमले, योगेश मोरे, अॅड विजय भालेराव, श्यामराव धुमाळ, सीमा भुजबळ, जयश्री चव्हाण, सुधीर निगडे, संभाजी काळाणे आदी उपस्थित होते.
माजी सरपंच सविता बरकडे यांनी प्रास्ताविक केले. तनुजा शहा व बाबूलाल पडवळ यांनी सूत्रसंचालन तर वैशाली काळे यांनी आभार मानले.

‘मी अजूनही फेस अन् बुकवरच’
नटीचा मुखवटा चेहऱ्यावर असला तरी अजून मी फेसबुकवर नसून फेस अन बुकवरच आहे. आजची स्त्री असली जरी गर्ती मी मानते तिला सशक्त स्त्री कर्ती. अशा स्त्रित्वाला अशा प्रभुत्वाला अशा पूर्णत्वाला आणि मातृत्वाला माझा मानाचा मुजरा आहे.

३८७८६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com