भोरला ५० नवे रुग्ण; गुरुवारी एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरला ५० नवे रुग्ण; गुरुवारी एकाचा मृत्यू
भोरला ५० नवे रुग्ण; गुरुवारी एकाचा मृत्यू

भोरला ५० नवे रुग्ण; गुरुवारी एकाचा मृत्यू

sakal_logo
By

भोर, ता. १३ : तालुक्यात गुरुवारी (ता. १३) एका दिवसात कोरोनाचे तब्बल ५० रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे तालुक्यातील गेल्या १३ दिवसांमधील कोरोनाग्रस्तांची संख्या २१६ झाली आहे. गुरुवारी सकाळी बारे ब्रु. गावातील एका कोरोनाग्रस्त महिलेचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील पहिला मृत्यू गुरुवारी झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. गुरुवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भोर शहरातील सर्वाधिक ११ रुग्ण आहेत. नसरापूर व भोलावडे येथे प्रत्येकी ३ रुग्ण, टिटेघर, नाझरे, कापूरव्होळ, खानापूर, बारे ब्रु. व केंजळ या गावांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत. तर सांगवी भिडे, नाटंबी, चिखलावडे, साळव, सावरदरे, न्हावी सर्व्हे नं २२, पांडे, किवत, केंजळ, येवली, केतकावळे, करंदी, दिडघर, केळवडे, शिंदेवाडी, कुसगाव, शिवरे, अंबाडे, पळसोशी, पोंबर्डी, शिंद व उत्रौली येथे प्रत्येकी १ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. काही कोरोनाग्रस्तांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून लक्षणे नसलेल्या काही रुग्ण घरातच विलगीकरण करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ कोरोनाग्रस्तांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन तालुका आणि नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु नागरिकांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रशासनाला कडक निर्बंध लावणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top