जनहित संघर्ष सेनेची राज्य कार्यकारणी जाहीर

जनहित संघर्ष सेनेची राज्य कार्यकारणी जाहीर

जनहित संघर्ष सेनेची राज्य कार्यकारणी जाहीर
पुणे, ता. १० : जनहित संघर्ष सेनेची राज्य जाहीर झाली आहे. सामाजिक राजेंद्र ऊर्फ अण्णा शेंडगे यांची महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पदनियुक्ती करण्यात आली. अशोक साठे यांची राज्य जनसंपर्क प्रसिद्धीपदी, परमेश्वर शिंदे यांची राज्य संघटक, सुनील खंडागळे यांची वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी तर सतीश माने यांची राज्य समन्वय पदीनियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रफुल्ल वीर, प्रदीप राजगुरू, शिवा पाटील आदी उपस्थित होते.

मूकबधिरांचा आदर्श सर्वांना घ्यावा : जगताप
पुणे, ता. १० : आयुष्य कसे जगावे हे मूकबधिरांकडून शिकले पाहिजे. त्यांना ऐकता-बोलता येत नसूनही ते त्यावर मात करून आनंदी जीवन जगतात. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
रेड क्रॉस मूकबधिर मित्र मंडळाच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे, पुणे सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका ॲड. रेणुका चलवादी, मंडळाचे संस्थापक देविदास पठारे, अध्यक्ष कुमावत, सविता माटा, अनुपना जाधव, संतोष वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी नृत्य, नाट्य तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा, होम मिनिस्टर तसेच लकी ड्रॉ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com