अमोल कोल्हे यांच्याकडून भ्रमनिरास ः आढळराव
चास, ता. ८ ः विश्र्वासघात करून निवडून गेलेले खासदार आपल्यापर्यंत किती वेळा आले, असा प्रश्न करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता त्यांच्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका केली.
आढळराव पाटील व पंचायत समितीचे सदस्य भगवान पोखरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या डेहणे-नायफड ते पोखरी गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन नायफड (ता. खेड) झाले. यावेळी आढळराव पाटील म्हणाले, ‘‘मतदारांना आता कळून चुकले आहे. निवडून दिलेल्या खासदाराने भ्रमनिरास केला आहे. काम करणाऱ्या माणसांना निवडून न दिल्याने किती तोटा होतो हे कळून चुकल्यानेच लोक आता शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहात आहेत.’’ यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वर्पे, जिल्हा महिला संघटक विजयाताई शिंदे, माजी सभापती भगवान पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काऴे, उपतालुकाप्रमुख संजय घनवट, अंबर सावंत, पंचायत समिती सदस्य ज्योतीताई आरगडे, केशव आरगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राम जाधव, मारुती सातकर, वाळदचे सरपंच शामराव कोरडे, विष्णू गाडेकर, नायफडच्या सरपंच उषा फलके, उपसरपंच दत्तू माळी, शांताराम तिटकारे, मंगेश पऱ्हाड, रोहिदास भाईक, सुनील मिलखे, राहुल मलघे, ज्ञानदेव तिटकारे, ग्रामसेविका अलका राहाणे, पप्पू थेऊरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन शांताराम तिटकारे यांनी केले. आभार सुनील मिलखे यांनी मानले.
PNE22S41559
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.