
शिवजयंतीनिमित्त बालचमूंनी साकारली पारंपरिक वेशभूषा
भोर, ता. २४ : राजगड ज्ञानपीठाच्या जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बालशिवाजी, जिजामाता आणि मावळ्यांच्या वेशभूषा पाहून पालकांचे डोळे दिपले. दोन वर्षानंतर जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासनाने शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी किल्ले बनवून आणले आणि आपल्या किल्ल्याविषयीची माहिती सांगितली. यामुळे पालकांच्या मनात इतिहास पुन्हा जागा झाला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रुबिना शेख आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख नीलम वीर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. विद्यालयातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविल्या. विद्यालयातील शिक्षिका अश्विनी देशमुख, सुवर्णा शिंदे, तृप्ती लिम्हण आदींनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..