भिगवण येथे विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिगवण येथे विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‍घाटन
भिगवण येथे विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‍घाटन

भिगवण येथे विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‍घाटन

sakal_logo
By

भिगवण, ता. २६ : शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होते. येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने २५ वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करून या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे केंद्र असलेल्या साईनाथ शिक्षण मंडळास सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिले.
भिगवण (ता. इंदापूर) येथे साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्य महोत्सवर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भरणे यांच्या हस्ते विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‍घाटन करण्यात आले. ते पुढे म्हणाले,‘‘साईनाथ शिक्षण संस्थेमध्ये भौतिक सुविधांसाठी आवश्यक ती मदत केली जाईल. शैक्षणिक संकुलामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २० लाख रुपये, व्यायामशाळेसाठी आवश्यक निधी व वाचनालयासाठी ५० हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अॅड. महेश देवकाते, डी. एन. जगताप, प्रताप पाटील, हनुमंत बंडगर, अभिजित तांबिले, प्रमिलाताई जाधव, हेमाताई माडगे, सचिन बोगावत, धनाजी थोरात, बाळासाहेब सोनवणे, संजय खाडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे व संचालक मंडळ उपस्थित होते. डॉ. चंद्रकांत खानावरे यांनी प्रास्ताविक, नीलेश चांदगुडे व डॉ. काशिनाथ सोलनकर यांनी सूत्रसंचालन तर, डॉ. अमोल खानावरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मुख्याधापिका सुचेता साळुंखे, पल्लवी वाघ, संचालक व शिक्षक यांचे विशेष परिश्रम घेतले.
PNE22S46076

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top