राज्यासाठी कोंढारची शाळा आदर्श मॉडेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यासाठी कोंढारची शाळा आदर्श मॉडेल
राज्यासाठी कोंढारची शाळा आदर्श मॉडेल

राज्यासाठी कोंढारची शाळा आदर्श मॉडेल

sakal_logo
By

भिगवण, ता. १ : ''''जिल्हा परिषदेच्या कोंढार चिंचोली शाळेने राबविलेला सायन्स वॉल हा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. शाळेतील इतरही उपक्रम दर्जेदार आहेत. सायन्स वॉल हा उपक्रम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तर राबविणार आहेच. त्याचबरोबर याची माहिती संसदेमध्येही देणार आहे. ही शाळा राज्यातील शाळांसाठी आदर्श मॉडेल ठरेल,'''' असा विश्वास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
करमाळा (जि.सोलापूर) तालुक्यातील कोंढार चिंचोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवोपक्रमांसाठी सातत्याने चर्चेत असते. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे संकल्पनेतून राबविलेल्या सायन्स वॉल व पृथ्वी क्षेपनास्त्र प्रतिकृती हे उपक्रम चर्चेत आहे.विद्यार्थिंनी कांचन तावरे, नेहा शिंदे यांनी खासदार सुळे यांना पत्राद्वारे शाळेला भेट देण्याची विनंती केली होती त्यास प्रतिसाद देत खासदार सुळे यांनी नुकतीच या शाळेस भेट दिली. यावेळी सोलापुर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सभापती अतुल पाटील, मंदाकिनी लकडे, मनोज राऊत, राजाराम भोंग, अनिल बदे, सरपंच नीलिमा गलांडे, उपसरपंच हनुमंत खांडेकर, अनिल गलांडे, निळकंठ शिंदे,नंदकुमार भोसले,राजेंद्र धांडे, सुहास गलांडे उपस्थित होते.
सायन्स वॉल उपक्रमासाठी मुख्याध्यापक हिराकांत शिंदे, शिक्षक महारुद्र पाटील, तानाजी पवळ, विठ्ठल इवरे, दादासाहेब चव्हाण,बाळासाहेब बोडखे, महेश ठोंबरे, शोभा निकम, अनिता बारवकर यांनी परिश्रम घेतले.

खासदार सुप्रिया सुळे भारावल्या
सायन्स वॉल, पृथ्वी क्षेत्रणास्त्र प्रतिकृती, परसबाग, ग्रंथालय, इनडोअर गेम, निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रीडांगण, खेळाचे साहित्य, १०० % विद्यार्थी व शिक्षक गणवेशात पाहून
खासदार सुप्रिया सुळे भारावून गेल्या. त्यांनी सायन्स वॉल या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शैक्षणिक लाभ होत आहे. हे जाणून घेतले व उपक्रमासाठी परिश्रम घेत असलेल्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

46509