पुरातन भोरेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरातन भोरेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
पुरातन भोरेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

पुरातन भोरेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

sakal_logo
By

भोर, ता. १ ः महाशिवरात्रीनिमित्त शहरातील पुरातन भोरेश्वर मंदिरात शंभूमहादेवाच्या दर्शनासाठी भर उन्हातही भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. आपल्या चिमुकल्यांना कडेवर घेऊन काही महिला दर्शनासाठी रांगेत उभ्या होत्या.
भोरेश्वर मंदिराला रंगरंगोटी केल्यामुळे भाविकांच्या आनंदात आणखीनच भर पडली. परंपरेप्रमाणे मंगळवारी(ता. १) पहाटे मंदिरात महादेवाला अभिषेक घालून महापूजा करण्यात आली. यावेळी भोरेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार देवी, विश्वस्त, पुजारी व गुरव समाजातील मंडळी उपस्थित होते.
मंदिराचे जीर्णोद्धार कर्ता म्हणून प्रसिद्ध असलेले यशवंत डाळ व शारदा डाळ यांच्या हस्ते महादेवाला अभिषेक करण्यात आला. महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मंगळवारी भोरचा आठवडे बाजार असल्यामुळे त्यात अधिकच भर पडली. सिंदिया कंस्ट्रक्शनचे राजकुमार शिंदे व माजी नगराध्यक्षा अॅड. जयश्री शिंदे यांच्यासह काही व्यक्तींनी भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली. भोर शहराशिवाय इतर गावांमध्येही भाविकांनी शंभूमहादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
फोटो ः PNE22S46874