डॉ. खानावरे यांचे कुटुंब
कोरोना काळात योगदान
कोरोना संकट काळात खानावरे कुटुंबातील सदस्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कोविड रुग्णांना मानसिक आधार देणे, योग्य मार्गदर्शन करून औषधांच्या उपलब्धतेसाठी सहकार्य केले. येथील कोविड सेंटरमध्ये सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असताना डॉ. अमोल खानावरे यांनी सेवा देत येथील शेकडो रुग्णांचे प्राण वाचविले. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून येथील कोविड सेंटर परिपूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले. भिगवण परिसरातील लोकांची वैद्यकीय गरज पूर्ण करण्यासाठी डॉ. चंद्रकांत खानावरे यांनी दिवसातील वीस-वीस तास सेवा दिली. तीच पंरपरा आजही कायम आहे.
हेल्थ आयकॉन कुटुंब
उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या भिगवण गावांमध्ये त्रेचाळीस वर्षांपूर्वी आरोग्याची स्थिती अतिशय बिकट होती. कठीण काळांमध्ये डॉ. चंद्रकांत खानावरे यांनी लोकांमध्ये आरोग्याचे महत्त्व रुजवत येथे आरोग्यसेवेची मुहूर्तमेढ रोवली. डॉ. चंद्रकांत खानावरे, डॉ. अमित खानावरे, डॉ. अमोल खानावरे, डॉ. स्मिता खानावरे व डॉ. शिवरानी खानावरे यांनी खानावरे हॉस्पिटल, मॅटर्निटी अॅँड डेंटल या भव्य व अद्ययावत हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वसाधारण आजारांबरोबरच कॅन्सर, स्त्री रोग, डेंटल, त्वचा रोग अशा सर्वच आजारांवर येथे यशस्वी उपचार करत ग्रामीण भागातील लोकांसाठी एक सक्षम पर्याय दिला आहे. खानावरे कुटुंबियांने भिगवण परिसराच्या आरोग्य, सामाजिक व शैक्षणिक विकासामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. लोकांसाठी ते खऱ्या अर्थाने हेल्थ आयकॉन ठरत आहेत.
PNE22S56974
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.