भोरमधील बागांवर मोकाट प्राण्यांचा ताबा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमधील बागांवर मोकाट प्राण्यांचा ताबा!
भोरमधील बागांवर मोकाट प्राण्यांचा ताबा!

भोरमधील बागांवर मोकाट प्राण्यांचा ताबा!

sakal_logo
By

भोर, ता. १२ : नगरपालिकेने १ कोटी १० लाखांचे कर्ज काढून उभारलेल्या चिल्ड्रन पार्क आणि नाना-नानी पार्कचा भोरवासीयांना फारसा फायदा होत नाही. उलटपक्षी नगरपालिकेचे पैसे पाण्यात गेले असून, भोरवासीयांवर याचा कराच्या रूपाने भार पडला आहे. सध्या बागा भिकाऱ्यांचे आणि मोकाट प्राण्यांचे निवासस्थान झाले आहे.
भोरमधील चिल्ड्रन पार्क व नाना-नानी पार्कमध्ये सद्यःस्थितीत गवत वाळलेले असून, झुडपे उगवली आहेत. नारळाच्या झाडांच्या व इतर झाडांच्या फांद्या पडलेल्या आहेत. खेळणी आणि बाके यांची दुरवस्था झाली आहे. येथे भटकी कुत्री भटकत आहेत. त्यामुळे बागेमध्ये कोणीही फिरकत नाही. पाणी, वीज व इतर साहित्याची रेलचेल असूनही नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी आणि नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे बागेची दुरवस्था झाली आहे.
कॉंग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष सचिन हर्णसकर यांच्या कालावधीत सन २०१३ मध्ये या चिल्ड्रन व नाना-नानी पार्कचे भूमीपूजन झाले; तर नगराध्यक्षा दीपाली शेटे यांच्या कालावधीत बागेचे उद्‍घाटन व लोकार्पण झाले. कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात बाग पूर्णपणे बंद होती. त्यानंतर सुरु झाल्यावर नगरपालिकेकडून योग्य ती दखल न घेतल्यामुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे भेटण्याचे ठिकाण बनले होते. ही गोष्ट लक्षात येताच नगरपालिकेने एका रखवालदाराची नेमणूक केली होती. परंतु, सद्यःस्थितीत बागेत ना रखवालदार ना पाण्याची सोय, ना विजेची सोय आहे. त्यामुळे नागरिक बागेकडे फिरकतही नाहीत. शिवाय बाग ही भिकाऱ्यांचे आणि मोकाट प्राण्यांचे निवासस्थान झाली आहे. शाळा-महाविद्यालयीन मुला-मुलींच्या परीक्षा झाल्या असून, सुटीचे दिवस सुरु झाले आहेत. परंतु, शहरात एकही बाग नसल्यामुळे मुलांच्याबरोबर पालकांमध्येही नाराजी पसरली आहे.

नगरपालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी ज्या उद्देशाने कर्ज काढून बागेची निर्मिती केली होती, तो उद्देश ते विसरले आहेत. बागेकडे नगरपालिका प्रशासनासह सत्ताधारी नगरसेवकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सद्यःस्थितीत भोरवासीयांना फिरण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी एकही जागा शहरात दिसत नाही.
- नितीन धारणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
PNE22S55774

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top