
भामा आसखेड धरणात युवकाचा बुडून मृत्यू
आंबेठाण, ता. १२ : मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी भामा आसखेड धरण (ता. खेड) परिसरात गेलेल्या एका ३४ वर्षीय युवकाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना करंजविहिरे (ता. खेड) येथे घडली. दत्ता वसंत भारती (रा. लक्ष्मी रोड, भारती मठ, वाशी, जि. धाराशिव), असे त्याचे नाव आहे.
दत्ता भारती हा त्याच्या तीन मित्रांसोबत शनिवारी (ता. ११) भामा आसखेड धरणाच्या बंधाऱ्याजवळ असणाऱ्या जलसाठा परिसरात पार्टी करीत होते. त्यावेळी दत्ता हा सहा ते सातच्या दरम्यान पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोन तासात त्याचा मृतदेह बाहेर काढला. याबाबतची खबर गजानन लक्ष्मण भारती यांनी यांनी म्हाळुंगे पोलिसांना दिली.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था व आपदा मित्र संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, जिगर सोलंकी, सत्यम सावंत, सचिन वाडेकर, श्रीयश भेगडे, अनिश गराडे, सार्थक घुले, गणेश सोंडेकर, कमल परदेशी, शांताराम गाडे, श्रीकांत बिरदवडे, सचिन भोपे, नितीन गाडे, पोलिस पाटील सचिन मरगज, विक्रांत चौधरी आदींनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली.
घटनास्थळी पीएसआय प्रदीप गायकवाड, पोलिस हवालदार राजू राठोड, पोलिस नाईक सचिन नागरे, पोलिस शिपाई शेखर खराडे, पोलिस शिपाई नेवाळे हे घटनास्थळी हजर होते.