
आंबेठाण सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक मांडेकर बिनविरोध
आंबेठाण, ता. १५ : आंबेठाण (ता. खेड) विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी आंबेठाणचे माजी सरपंच अशोक नारायण मांडेकर यांची, तर उपाध्यक्षपदी इंदूबाई देवराम पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष दत्तात्रेय मारुती चव्हाण आणि उपाध्यक्ष रूपेश अशोक बुट्टे-पाटील यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या निवडणूकप्रसंगी मावळते अध्यक्ष दत्तात्रेय चव्हाण, उपाध्यक्ष रूपेश बुट्टे-पाटील, दीपक मांडेकर, दत्तात्रेय पडवळ, विश्वास बुट्टे-पाटील, संतोष मांडेकर, बबन घाटे, धोंडिभाऊ पडवळ, गीताबाई मांडेकर, जयसिंग चव्हाण, भानुदास बुट्टे-पाटील आदी संचालकांसह माजी सभापती दत्तात्रेय भेगडे, माजी सरपंच दत्तात्रेय मांडेकर, बाबासाहेब पडवळ, गणेश मांडेकर, संतोष मांडेकर, शिवराम कार्ले, शंकर मांडेकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. बी. मुलाणी यांनी काम पाहिले, त्यांना सोसायटी सचिव पंढरीनाथ गोपाळे यांनी मदत केली.
------------------
अध्यक्ष -अशोक मांडेकर फोटो. abt 15 p1, उपाध्यक्ष-इंदूबाई पडवळ फोटो abt 15 p2.