उज्ज्वला वाळके यांना सहकार रत्न पुरस्कार

उज्ज्वला वाळके यांना 
सहकार रत्न पुरस्कार
Published on

आंबेठाण, ता.२६ : म्हाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकार पतसंस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला दिलीप वाळके यांना सहकार रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशन व आमदार शिवाजीराव भोसले पतसंस्था प्रशिक्षण केंद्रामार्फत हा सन्मान देण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व पगारदार पतसंस्थांमध्ये ज्या महिला अध्यक्ष, उपाध्यक्ष,संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी, कर्मचारी अशा वेगवेगळ्या पदांवर आपले कर्तृत्व दाखवत असतात, अशा महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
उपनिबंधक साधना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष रेश्मा अनिल भोसले, उपाध्यक्ष श्यामराव हुलावळे, मानद सचिव संतोष भेगडे यांचे सहकार्य लाभले. यावेळी व्यवस्थापिका वैशाली गटे, संचालिका कृतिका वाळके उपस्थित होते.

03583

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com