वडगाव रासाई येथे रंगला आखाडा

वडगाव रासाई येथे रंगला आखाडा

आंधळगाव, ता. २५ : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे श्री रासाई देवी यात्रेनिमित्त आयोजित लाल मातीवरील आखाड्यात बुधवारी (ता. २४) निकाली ऐंशी कुस्त्या रंगल्या. मानाची अंतिम कुस्ती पहिलवान प्रदीप नवनाथ शेलार (वडगाव रासाई, ता.शिरूर) विरुद्ध अभिषेक अजित गद्रे (शिरसगाव काटा, ता. शिरूर) यांच्यात झाली. अर्धा तास रंगलेली ही कुस्ती अखेर बरोबरीत सोडवण्यात आली.त्यांना विभागून इनाम देण्यात आला. आखाड्यात पुणे, नगर जिल्ह्यातील दीडशे नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला. चितपट कुस्ती करणाऱ्या पहिलवानांना इनाम म्हणून रोख स्वरूपात सव्वा दोन लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. विजेत्या पहिलवानाला पंचवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस दिल्याची माहिती पांडुरंग शेलार, किरण ढवळे यांनी दिली.
श्री रासाई देवी यात्रेनिमित्त मंगळवारी (ता. २३) सकाळी देवींची घटस्थापना, रात्री देवीचा छबिना, आरती, रात्री वसंत नांदवळकर लोकनाट्य तमाशा झाला. बुधवारी (ता. २४) सकाळी हजेऱ्यांचा कार्यक्रम, दुपारी कुस्त्यांचा आखाडा, रात्री ९ ते १२ मालती इनामदार लोकनाट्य तमाशा आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यात्रेनिमित्त नऊ दिवस येथे देवीची घटस्थापना स्थापना केली जाते.पाचव्या व सातव्या माळेला राज्यभरातून भाविक येतात. नवव्या दिवशी देवीचा गोंधळ घातला जातो. घट उठल्यानंतर भीमा नदीत असलेल्या मधल्या बहिणीची भेट घेण्यासाठी देवींची पालखी होडीच्या साहाय्याने पाण्यातील मंदिरात नेली जाते. यावेळी गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढत शोभेचा दारूगोळा, झांजपथक फटाके व गाण्यांचे पथक अशा स्वरूपात रात्री बारा वाजता पालखी मूळ देवीच्या मंदिरात पुन्हा परत येते. कुस्त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर देवीच्या मानकऱ्यांना व सेवेकऱ्यांना मानाचा विडा देण्यात आला. कुस्ती आखाड्यात पंच म्हणून पोपट शेलार, गोविंद शेलार, नवनाथ शेलार, कुंडलिक ढवळे, पोपट चव्हाण, विकास परभाणे, विदुर शितोळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन उद्धव शेलार यांनी केले. कुस्त्यांचा आखाडा व यात्रा महोत्सवाचे नियोजन पांडुरंग शेलार, रामजी शेलार, सुरेश ढवळे, पंढरीनाथ शेलार, रामचंद्र शेलार, सचिन पवार, उत्तम शेलार, किरण ढवळे आदींनी केले. यावेळी सरपंच सचिन शेलार, उपसरपंच मनोज शेलार, मनोहर शेलार, ठकसेन ढवळे, वीरेंद्र शेलार, म्हस्कु ढवळे, सुजित शेलार, हरिभाऊ चांदगुडे, दिलीप काळे, अजित गद्रे, अंकुश सोनवणे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com