मांडवगण येथून पालखी सोहळा मार्गस्थ

मांडवगण येथून पालखी सोहळा मार्गस्थ

आंधळगाव, ता. ४ : ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला’, ‘जय जय राम कृष्ण हरि’च्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील वाघेश्वर पालखी सोहळा मांडवगण फराटा येथून पंढरपूरला मार्गस्थ झाला.
अनेक वर्षांपासून मांडवगण फराटा ते पंढरपूर आषाढी वारी निघत असते. प्रस्थानाची महापूजा हभप सिद्धगुरू शांतीनाथ महाराज (पंढरपूर) यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर भानुदास फडके (कानगाव) यांच्या हस्ते वीणा पूजन, रामचंद्र नागवडे यांच्या हस्ते अभिषेक आणि दत्तात्रेय फराटे यांच्या हस्ते टाळपूजन करण्यात आले.
वाघेश्वर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सर्जेराव फराटे (गुरुजी), संपतराव जगताप (कानगाव) यांच्या हस्ते पालखी पूजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी घोडगंगाचे संचालक संभाजी फराटे, सरपंच समीक्षा कुरूमकर फराटे, उपसरपंच पांडुरंग मोरे, अशोक जगताप, गोविंद फराटे, बाबासाहेब फराटे, ज्ञानेश्वर फराटे, शंकर फराटे, आत्माराम फराटे, अमोल जगताप, अमोल शितोळे, शरद गायकवाड आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे हे तेविसावे वर्ष आहे.
वारीत परिसरातील बाभूळसर, गणेगाव दुमाला, तांदळी, इनामगाव, पिंपळसुटी, वडगाव रासाई, नानविज, कानगाव, हातवळण, गार या गावातून वारकरी सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्यासाठी बैल जोडीचा मान अविनाश फराटे यांना मिळाला. या पालखी सोहळ्यात एकूण सोळा मुक्काम असून ठिकठिकाणच्या मुक्कामी गावांमध्ये महाप्रसादाचे आणि कीर्तनाचे आयोजन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com