रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे
दुचाकीस्वार गंभी जखमी

रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे दुचाकीस्वार गंभी जखमी

Published on

आंधळगाव, ता. १० : आंधळगाव (ता. शिरूर) येथे न्हावरे- चौफुला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे बुधवारी (ता. १०) सकाळी आठच्या सुमारास दुचाकीस्वार जखमी झाला. मच्छिंद्र भागूजी मोरे (वय ६६, रा. जेऊर, ता. नगर) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आंधळगाव येथे ऊर्जा डेअरी परिसरात न्हावरे- चौफुला राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या परिसरातील रस्त्यावर कुठेही कामाच्या माहितीचे फलक लावलेले नाहीत. मोरे हे नगर जेऊर येथील रहिवासी असून, ते बुधवारी (ता. १०) सकाळी सहाच्या दरम्यान दुचाकीवरून मोरगाव येथील आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. ते दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील अपूर्ण काम त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्याच्या खटकीला धडकल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी जोरात रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उडून पडली. या अपघातात मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच ,त्यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, जखमी मोरे यांना राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडियाचे अध्यक्ष संतोष खरात, संदीप खरात, नवनाथ सूळ, संतोष कुसेकर, दत्तात्रेय भोसले आदी स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच मदत केली. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

आंदोलनाचा इशारा
या रस्त्याचे ठिकठिकाणी काम अपूर्ण असून वारंवार अपघात होत आहेत. अपूर्ण रस्त्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. तसेच, अनेकजण अपघातात जायबंदी झाले आहेत. संबंधित विभाग अपूर्ण रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. संबंधित विभागाने येथील अपूर्ण रस्त्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा संतोष खरात यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.