तांदळीत वाहनांच्या लांबच लांब रांगा

तांदळीत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Published on

मांडवगण फराटा, ता. २४ : न्हावरे- बीड महामार्गाच्या अर्धवट कामामुळे मंगळवारी (ता. २४) नऊ वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पालखी सोहळ्यामुळे सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंड-न्हावरेमार्गे-शिक्रापूर अशी वळविण्यात आली होती. त्यामुळे दिवसभर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
तांदळी (ता. शिरूर) येथील पुलाजवळ काष्टी बाजूने या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याने त्याचा मंगळवारी वाहतुकीला चांगलाच फटका बसला. तांदळी बाजूकडे कळसकर वाडीपर्यंत तब्बल तीन किलोमीटर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मांडवगण फराटा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. काष्टी बाजूकडे अहिल्यानगर दौंड या मुख्य रस्त्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने बेशिस्त वाहनचालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक वळविल्याने सकाळपासूनच कंटेनर, डंपर, एसटी बसेस, खासगी बसेस आदी वाहनांची रेलचेल सुरू होती. या परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे येथून अवजड वाहन जात असताना ते खड्ड्यांमुळे उलटण्याच्या भीतीने दुचाकी चालक व नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत होते.
दरवर्षी शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात दिंड्या व पालख्या या रस्त्याने जात असतात. मात्र, मंगळवारी तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ झालेल्या वाहतूक कोंडीचा वारकऱ्यांना सामना करावा लागला, तर काही दिंडी चालकांनी वाहतूक कोंडीच्या अलीकडेच पालखी सोहळा उभे ठेवणे पसंत केले.

वाहतूक कोंडीत अडकल्या पालख्या
पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे न्हावरेकडे वळविण्यात आल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी प्रशासनाने पोलिस तैनात करणे गरजेचे होते. मात्र, या रस्त्यावर कुठेही पोलिस तैनात नसल्याने वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवत होती. वाहतूक कोंडीमुळे लांब पल्ल्याच्या एसटी बसेस, विविध तालुक्यातील अनेक पालख्या तीन तासांपेक्षा अधिक काळ अडकून पडल्या होत्या. तब्बल तीन तासानंतर मांडवगण फराटा पोलिस चौकीचे पोलिस हवालदार अमोल गवळी, होमगार्ड राहुल चौगुले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हळू हळू वाहतूक सुरळीत केली.

तांदळी येथे न्हावरे- बीड महामार्गाचे काष्टी बाजूकडील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. सातत्याने येथे अपघात होऊनही महामार्गाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या रस्त्यावरील खड्डे संबंधित विभागाने त्वरित बुजवावेत.
- तुकाराम निंबाळकर, सरपंच, गणेगाव दुमाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com