जखमी बिबट्याची कोळगावात दहशत
आंधळगाव, ता. २४ : कोळगाव डोळस (ता.शिरूर) येथे जखमी अवस्थेत बिबट्या आढळून आला. यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी अवस्थेतील हा बिबट्या अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात असून, वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोळगाव डोळस परिसरातील आसपासच्या शेतात जखमी बिबट्यासोबत इतरत्र दोन बिबटे मुक्त संचार करताना नागरिकांच्या निदर्शनास आले आहेत. उसाचे क्षेत्र अधिक असल्याने येथे डुक्कर, ससे, लांडगे, कोल्हे, तरस, साळींदर असे लहान मोठ्या वन्यप्राण्याचे वास्तव्य आहे. कोळगाव परिसरातील शेलारवस्ती, कुलवस्ती, साठेवस्ती, धामोरे वस्ती, शेडवस्ती आदी परिसरात घरासमोर अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिला आहे. काही दिवसापूर्वी मेंढपाळांच्या दोन शेळ्या बिबट्याने चारताना हल्ला करून ठार केल्या आहेत. यातील एक बिबट्या एका पायाने लंगडताना दिसून आला आहे. त्याच्या पायाला जखमा असल्याने तो शिकार शोधण्यासाठी अधिक धाडसी बनू शकतो,अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
याबाबत कोळगाव डोळस ग्रामपंचायतीने दोन वेळा वन विभागाला पत्र देऊनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
कोळगाव डोळस परिसरात जखमी बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांकडून समजले आहे. वनविभागाचे कर्मचाऱ्यांकडून संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली जाईल.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.
- नीलकंठ गव्हाणे -वनपरीक्षेत्र अधिकारी वनविभाग शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.