‘नागरगाव बंधाऱ्याची लवकरच दुरुस्ती’

‘नागरगाव बंधाऱ्याची लवकरच दुरुस्ती’

Published on

आंधळगाव, ता. ६ : ‘‘शिरूर व दौंड तालुक्याच्या शेतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नागरगाव येथील बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल’’, अशी ग्वाही शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांनी दिली.
नागरगाव (ता.शिरूर) येथील बंधाऱ्याच्या नुकसानीची शनिवारी (ता.२) पाहणी करताना कटके बोलत होते. ते म्हणाले की, पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. बंधाऱ्याच्या ढापे वेळेवर काढता न आल्याने बंधाऱ्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार कटके यांनी यावेळी सांगितले. नागरगाव बंधाऱ्याच्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी संबंधित विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पाऊस उघडताच दुरुस्तीचे काम सुरू होईल, त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी विविध अडचणी कटके यांच्यासमोर मांडल्या असता, त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल रणदिवे, शरद कालेवार, नागरगाव सोसायटीचे माजी अध्यक्ष शरद साठे, माजी उपसरपंच नामदेव पवार, शिंदोडीचे सरपंच अरुण खेडकर, इंद्रजित वाळुंज, रांजणगावचे उपसरपंच प्रवीण रणदिवे, योगेश देशमुख, उमेश रणदिवे, महेंद्र बिडगर, पांडुरंग गरुड, दीपक कोकडे, कल्याण वाघचौरे, विकास शितोळे, सुनील जाधव, स्वप्नील रेड्डी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
02300

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com