खोकल्याच्या औषधासाठी आणा रिकामी बाटली

खोकल्याच्या औषधासाठी आणा रिकामी बाटली

Published on

प्रमोल कुसेकर

मांडवगण फराटा, ता.५ : तांदळी (ता. शिरूर) येथील उपआरोग्य केंद्रात खोकल्याचे औषध घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ‘‘रिकामी बाटली घेऊन या’’ असा सल्ला दिला जात असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या विचित्र नियमामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात मांडवगण फराटा येथील आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधासाठी रिकामी बाटली आणण्यास सांगितल्याचा प्रकार उघड झाला होता.त्यानंतर शिरूर तालुका आरोग्य विभाग तसेच जिल्हा आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्रांना औषधासाठी बाटल्या उपलब्ध करून दिल्याचे सांगितले होते. मात्र विभागाचा हा दावा तांदळी येथील वास्तवामुळे खोटा ठरला आहे. तांदळी हे शिरूर तालुक्यातील पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे गाव असून येथील उपआरोग्य केंद्र मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येते. सुमारे चार हजार लोकसंख्येसाठी एक समुदाय आरोग्य अधिकारी, एक आरोग्यसेवक, एक आरोग्य सेविका व चार आशासेविका कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित नव्हते. येथे एकूण सात कर्मचारी असताना आरोग्य सेवक उपस्थित होते. सोमवारी (ता.३) सकाळी खोकल्याचे औषध घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना ‘‘औषध पाच लिटरच्या कॅनमध्ये आहे, ते नेण्यासाठी बाटली आणा,’’ असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक रुग्णांवर पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन औषध नेण्याची वेळ येत आहे.

‘‘वीस रुपयांची बाटली विकत घेण्यापेक्षा मेडिकलमधून औषध घेणे परवडेल,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.दरम्यान, इनामगाव उपकेंद्रात एका हॉटेलमधील वापरलेल्या बाटल्या औषध भरण्यासाठी आणल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मागील आठवड्यात मांडवगण फराट्यातही अशीच घटना समोर आली असून, त्यानंतरही आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. “आरोग्य विभाग नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे,” असा आरोप ग्रामस्थ रवी कळसकर व किरण कळसकर यांनी केला.

कोट
खोकल्याचे औषध देण्यासाठी उपआरोग्य केंद्रात बाटल्या उपलब्ध आहेत का, या संदर्भात मला माहिती नाही.यासंदर्भात माहिती घेऊन सांगतो.
- राजेश कट्टीमणी, तालुका आरोग्य अधिकारी,शिरूर


2498

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com