मांडवगणमधील दवाखाना पशुपालकांसाठी वरदान
प्रमोल कुसेकर : सकाळ वृत्तसेवा
मांडवगण फराटा, ता. १७ : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातून ‘नोकरी नाही तर सेवा’ या भावनेने कार्य करणारे कर्मचारी आदर्श निर्माण करत आहेत. अधिकारीपद रिक्त असूनही कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्यामुळे दवाखाना परिसरातील शेतकरी व पशुपालकांसाठी वरदान ठरला आहे.
गेल्या वर्षी २६१६ जनावरांवर उपचार झाले होते, तर यंदा ती संख्या दुपटीने वाढून ४९८१ वर पोचली आहे. विशेष म्हणजे, दवाखान्याचे कर्मचारी सकाळी सात वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर जाऊन उपचार सेवा देतात. यामुळे पशुपालक समाधानी आहेत. येथे एक कृत्रिम रेतन केंद्र असून महिन्याला सरासरी ९० रेतन प्रक्रिया केली जाते. HF, मुऱ्हा आणि खिलार या जातींचे जनावरे प्रामुख्याने आढळतात. वर्षभरात ५९६ जनावरांची गर्भ तपासणी करण्यात आली आहे. दवाखान्यातर्फे लसीकरणासाठी १४ प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सुसज्ज इमारत असलेल्या या दवाखान्यात चार पदे मंजूर आहेत. त्यातील पशुधन विकास अधिकारी हे पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. तरीही पशुधन पर्यवेक्षक दादासाहेब ठुबे, व्रणोपचारक ए.डी.कुंभार आणि परिचर व्ही.पी.कांबळे यांच्या एकजुटीने पशुसंवर्धन सेवा अखंडपणे सुरू आहेत. या दवाखान्याअंतर्गत मांडवगण फराटा, फराटेवाडी, बाभुळसर बुद्रुक आणि गणेगाव दुमाला ही गावे येतात.
२०२४ च्या जनगणनेनुसार पशुधन संख्या
गाई...........५७०१,
म्हशी...........२२९४
शेळ्या...........१५४८
मेंढ्या...........५०१
इतर जनावरे...........३००
लसीकरण
७६००.......लाळ्या-खुरकूत
याची आहे गरज
- पशुखाद्य उत्पादक युनिट
- दवाखान्यासाठी संरक्षक भिंत
- पशुधन विकास अधिकारी पद
चारा योजना
- भागात सुमारे २०० हेक्टर चारा उत्पादन क्षेत्र
- मुबलक हरित चारा उपलब्ध असल्याने चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होत नाही.
- अनेक शेतकरी स्वतःच मुरघास तयार करतात.
दृष्टिक्षेपात दवाखाना
- वर्षभरात १७ प्रशिक्षण सत्रे आयोजित
- दवाखान्याकडे आवश्यक औषधसाठा उपलब्ध
- दोन हजार जनावरांना जंतनाशक औषधे
- ११४० किलो बियाणांचे वाटप
- बछड्याचा जन्मदर ३० तर वंधत्व दर ८ ते ९ टक्के
योजनांमध्ये ११०० हून अधिक पशुपालकांचा सहभाग
अनुसूचित जाती-जमातींसाठी शासनाच्या गाय गट, शेळी गट, मिल्किंग मशिन, मॅट अनुदान आदी विविध योजना ७५ टक्के अनुदानासह जिल्हास्तरावर राबवल्या जात आहेत. तसेच गायगोठा योजना, मांसल पक्षी वाटप, मेंढी-शेळी विकास योजना आणि कुक्कुटपालन प्रकल्प या योजना सातत्याने राबविल्या जात आहेत. योजनांमध्ये ११०० हून अधिक पशुपालकांनी सहभाग नोंदवला.
राज्यातील पहिला दवाखाना म्हणून नावलौकिक
महाराष्ट्रात पहिली पशुगणना ऑनलाइन पूर्ण करणारा दवाखाना म्हणून मांडवगण फराटा पशुचिकित्सालयाने राज्यात नावलौकिक मिळवला आहे. शेतकरी गट,महिला बचत गट आणि पशुपालकांना नियमित मार्गदर्शन दिल्याने हा दवाखाना आज सेवा,प्रामाणिकपणा आणि शेतकरीहिताचे प्रतीक ठरला आहे.
आमच्याकडे कुठलाही निधी येत नसला तरी सेवा देण्यात कधीही तडजोड होत नाही. पशुसेवा हीच ईश्वरसेवा,अशी आमची भावना आहे.
- दादासाहेब ठुबे, पशुधन पर्यवेक्षक
मागील दोन वर्षांत दवाखान्यात राबवलेलेले उपक्रम
...............२४-२५...............२५-२६ (ऑक्टोबरपर्यंत)
औषधोपचार...............२६१६...............४९८१
लसीकरण...............१७२६५...............१४८३१
कृत्रिम रेतन...............२४०...............२९०
वासरे जन्म नोंदी...............२४९...............१३८
गर्भधारणा तपासणी...............३६८...............५९६
वंधत्व तपासणी...............१५९...............३१७
विविध कार्यक्रम...............६...............१७
02517
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

