इनामगावातील दवाखान्यावर बिबट्याच्या हल्ल्यांमुळे ताण

इनामगावातील दवाखान्यावर बिबट्याच्या हल्ल्यांमुळे ताण

Published on

प्रमोल कुसेकर : सकाळ वृत्तसेवा
मांडवगण फराटा, ता.२५ : इनामगाव (ता.शिरूर) येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सुसज्ज इमारत असली तरी रिक्त पदे आणि प्रशासकीय दिरंगाईचे ग्रहण कायम आहे. शिरूरच्या पूर्व भागात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. मृत पाळीव जनावरांचे शवविच्छेदनही याच दवाखान्यात होते. त्यामुळे अतिरिक्त ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत रिक्त पदांमुळे मोठी कसरत करावी लागत असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी तारांबळ उडत आहे.

दवाखान्यात एकूण तीन मंजूर पदे असून, त्यापैकी वर्णोपचारकाचे पद मागील अडीच वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे दवाखान्याच्या कामकाजावर थेट परिणाम होत आहे.
दररोजच्या कामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, हे पद तातडीने भरावे, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. इनामगाव चिकित्सालयाच्या (श्रेणी १)कार्यक्षेत्रात तांदळी, इनामगाव आणि पिंपळसुटी या गावांचा समावेश होतो.


पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ
इनामगावातील पशुवैद्यकीय चिकित्सालय १५ गुंठे क्षेत्रात उभारले असून, संपूर्ण परिसराला संरक्षक भिंतही बांधली आहे. तरीही कर्मचारी संख्या अपुरी असल्याने सेवा व्यवस्थित देण्यास अडचणी येत आहेत. येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खटके हे दररोज सकाळी सात वाजता दवाखान्यात उपस्थित राहत शेतकरी व पशुपालकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कर्मचारी कमतरतेमुळे त्यांच्या कामकाजात अडथळे येत आहे. अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे तारांबळ उडत आहे.


सर्व पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी १), इनामगाव येथे उपलब्ध असलेल्या जंतनाशके,मिनरल मिक्सचर, चाटण-विटा इत्यादी विविध औषधांचा योग्य लाभ घ्यावा.एफ-एम-डी, लंपी तसेच इतर रोगांचे लसीकरण वेळेवर करून घेणे अत्यावश्यक आहे.
- डॉ. प्रशांत खटके, पशुवैद्यकीय अधिकारी, इनामगाव


इनामगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकांना उत्तम सेवा देण्याचे काम केले जात आहे. दवाखान्यात रिक्त असलेली पदे शासनाने त्वरित भरावीत.
- शिरीष मोकाशी - शेतकरी, इनामगाव ता.शिरूर
...........................

परिसरातील पशुधन
गाय........५७१७
म्हैस........११८२
शेळी........२१९३
मेंढी........२३५


एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
एकूण उपचार........३८४३
गर्भधारणा तपासणी........४०२
कृत्रिम रेतन संख्या........३०९
वंध्यत्व निर्मूलन संख्या........१६०


लसीकरण
लाळ्या खुरकत..............५०७०
लंपी..............५५००
पीपीआर/इटी (मेंढी व शेळी)..............१९००
घटसर्प..............१९००
फऱ्या..............२००

परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
लंपी


थायलेरिया

वैरणीसाठी मका, ज्वाची बियाणे वितरण
२३-२४ - २५० किलो
२४ -२५ - १७०किलो


चारा उत्पादन क्षेत्र.......... ९५० हेक्टर
गावातील सिंचित ओलिताखाली क्षेत्र.....१९११ हेक्टर


वार्षिक चारा (टनांत)
हिरवा....... ८६५२०
वाळलेला....... २८५०

इनामगाव (ता.शिरूर) : म्हशीवर उपचार करताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खटके.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com